
चंद्रपुरात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू
चंद्रपूर. गेलेकाही दिवस विदर्भाच्या (Vidharbha) विविध भागांतून वाघाच्या शिकारी व मृत्यूच्या बातम्या समोर येत आहे. चंद्रपुरात (Chandrapur) उच्छाद घालणाऱ्या आणि त्यामुळेच जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचा शुक्रवारी नागपूरच्या गोरेवाडा ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पातील तळ्यात वाघाचा मृतदेह आढळून आला होता. तपासात या वाघाची शिकार करून त्याचे अवयव काढून घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाच शिकार करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यातच आता भद्रावती तालुक्यातील माजरी (Majari in Bhadravati taluka) येथे जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन वाघिणीचा मृत्यू (Tigress dies from electrocution) झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
संक्रांतीच्या दिवशी रविवारी १५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास माजरी येथील रेल्वेच्या मुख्य लाईनजवळील सी केबिनच्या मागील भागात वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वाघीण मृतावस्थेत दिसताच याबाबत रेल्वे कर्मचाऱ्याने माजरी पोलिसांना माहिती दिली. माजरी येथील देवराव पाटेकर यांच्या शेतात वन्यप्राण्यांपासून पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी जिवंत विद्युत प्रवाहची फेंसिंग करण्यात आली आहे. वाघिणीचा मृतदेह फेंसिंगच्या ताराला गुंडाळला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी पुढे पाठविला असून अहवाल आल्यावर वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल. संपूर्ण जगाचा विचार केल्यास सर्वाधिक वाघ महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांच्या सुरक्षेसाठी वनविभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही वाघांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. शिकाऱ्यांकडून वाघांना लक्ष्य केले जात असल्यानेही चिंता वाढली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात चक्क वाघाची शिकार करून मृतदेह तलावात टाकून देण्यात आला होता. वाघाचे शरिर कुजले असल्याने तो वाघ किंवा अन्य प्राणी ते ओळखणे देखील कठीण झाले होते. वाघांच्या मृत्युमुळे वन व प्राणीप्रेमींमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
4,359 total views, 3 views today