
नाशिक (nasahik) नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे नेते (satyjit tambe) सत्यजीत तांबे हे काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत (Rebel Congress Leader Satyajeet Tambe) आहेत. तांबे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुकवरील बायोमधून काँग्रेस पक्षाचे नाव हटवले आहे. ‘वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावचं लागतं’ असा सूचक मजकूरही त्यांच्या फेसबुक आणि ट्विटरच्या कव्हर पेजवर झळकत आहे. काँग्रेसच्या शिस्तभंग समितीने यापूर्वीच त्यांच्या निलंबनाची शिफारस केली आहे. काँग्रेसचा आधार न घेता सत्यजित तांबे पदवीधर निवडणुकीसाठी मतदारांना साद घालताना दिसत आहेत. त्यामुळे ते काँग्रेसला रामराम ठोकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. लवकरच त्यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीत उमेदवारीसाठी सत्यजित तांबे इच्छूक होते. त्यांनी याबाबत पक्षाला कळवले देखील होते. मात्र, पक्षाकडून त्यांचे वडील आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तेव्हापासूनच सत्यजित तांबे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होता. काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तर सत्यजीत तांबे यांच्यावर ही कारवाई कुठल्याही क्षणी होऊ शकते. दरम्यान, काँग्रेसच्या कारवाईपूर्वीच सत्यजित तांबे यांनी आक्रमक होत आपल्या सोशल मीडियावरुन काँग्रेस पक्षाची ओळख हटवली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी आता काँग्रेस पक्षाशी असलेले नाते तोडल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे भाजपने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेस सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई कधी करते, याकडे भाजपचे लक्ष लागलेले आहे. त्यानंतर भाजपकडून पत्ते उघड केले जाणार आहेत. अंतिम लढत सत्यजित तांबे व महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यातच होईल, असे सध्याचे चित्र आहे.
597 total views, 4 views today