
औरंगाबाद : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची इच्छा बाळगून असलेल्या नेत्यांकडूनही मंत्रिपदाचे दावे पुढे येत आहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली (Bachchu Kadu wants to become a Mininter) आहे. मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करताना त्यांनी खात्याची पसंती देखील मांडली असून त्यांना दिव्यांग मंत्रालय हवे आहे. औरंगाबाद येथे निवडणूक प्रचारास गेलेल्या कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली मंत्री होण्याची इच्छा प्रकट केली
बच्चू कडू म्हणाले की, आपली मंत्रिपदासाठी अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल. ही इच्छा बोलतून दाखविताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. दिव्यांग मंत्रालयाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षापासून बोलत होतो. परंतु मंत्रालय झाले नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या सहा महिन्यात मंत्रालय स्थापन केले. दिव्यांग मंत्रालयासाठी आम्ही 20 वर्षापासून संघर्ष केला. अनेक गुन्हे दाखल झालेत. दिव्यांग मंत्रालय झाले याच आनंदात मंत्रीपद विसरलो. मात्र, अपेक्षा कायम असून दिव्यांग मंत्रालय मिळाल्यास मलमपट्टी अधिक जोमाने करता येईल, असे कडू म्हणाले.
राजकीय युती टिकत नाही
वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीवर भाष्य करताना राजकीयदृष्ट्या केलेली युती किंवा आघाडी टिकत नसते, असा टोला त्यांनी लगावला. तर शिक्षक मतदार संघ निवडणूकीत भाजप बरोबर मैत्रीपुर्ण लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
411 total views, 3 views today