
वर्गातच सोडले प्राण, यवतमाळमध्ये हळहळ
यवतमाळ. राज्यात सध्या परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. बार्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने शाळांमध्ये सराव परीक्षा घेतल्या जात आहेत. पालकांचा दबाव, अभ्यासाच्या ताण यामुळे विद्यार्थी दडपणात आहेत. त्यातून अप्रिय घटनाही समोर येत आहेत. गणिताचा सराव पेपर (Mathematics Practice Paper ) सोडवताना वर्गातच एका दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू (Death of a class 10 student) झाल्याची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभळगावमध्ये (Babhalgaon in Yavatmal District ) ही दुर्दैवी घटना घडली. प्रतीक गजानन थोटे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो सरूळ गावचा रहिवासी असल्याचे समजते. या घटनेनंतर संपूर्ण यवतमाळात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पालकांच्या चिंतेतही भर पडली आहे.
प्रतीक गणिताचा सराव पेपर सोडवत होता. त्यावेळी त्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे तो जागेवरच पडला. यामुळे शाळेत खळबळ उडाली. गजानन पडल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी गर्दी केली. शिक्षकांनी धावपळ करीत त्याला तातडीने गावातल्या दवाखान्यात दाखल नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकून साऱ्यांनाच धक्का बसला.
प्रतीकचे काही दिवसांपूर्वी एक मोठे ऑपरेशन झाले होते. त्यातून त्याची तब्येत सावरली होती. त्याने नियमितपणे शाळेत जाणे सुरू केले होते. तो उत्कृष्ट खो-खो खेळाडूसुद्धा होता. काही दिवसांपूर्वी प्रतीकने खो-खो स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या संघाने पहिला क्रमांक पटकावला होता. तो मित्रांमध्ये सर्वांचा चाहता होता. मात्र, वर्गातच त्याला तीव्र स्वरूपाची फिट येऊन अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
प्रतीक पडल्याचे समजताच शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. तसेच प्रताप शिक्षण मंडळाचे सचिव जयवंत घोगे, मुख्याध्यापक नलिनी पाटणे व शिक्षकांनी त्याच्या घरी जात कुटुंबाला आधार दिला. मात्र, या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. प्रतीकचा मृत्यू नेमका कशाने झाला, याबद्दल नाना चर्चा सुरू आहेत.
939 total views, 3 views today