
नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या गडाला धक्का बसला असून पहिल्या फेरीच्या मतमोजणीतच महाविकास आघाडी समर्थित विदर्भ शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी भाजप समर्थित नागो गाणार याचा सात हजारांवर मतांनी पराभव केला. नागपुरातील ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र, शिक्षक मतदारांनी भाजपवर रोष व्यक्त करीत महाविकास आघाडीच्या पारड्यात मतदान टाकले. गाणार यांच्याबद्धलची नाराजी, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाजपकडून स्पष्ट आश्वासनाच्या अभावाचा फटका भाजपला बसल्याचे बोलले जात आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाल्याची माहिती आहे. पदवीधर मतदारसंघासोबतच आता शिक्षक मतदारसंघही भाजपच्या हातून निसटल्याने भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघाची ही जागा मागील दोन टर्मपासून भाजपकडे होती. नागपूरचे प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे ही जागा भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना भाजपकडून समर्थन मिळत होते. मात्र, गाणार यांच्याबद्धल संघटनेतच असलेल्या नाराजीमुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, असे चित्र होते. अखेरच्या क्षणी भाजपने गाणारांना पाठिंबा देत पुन्हा मैदानात उतरविले. शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरून भाजपकडून स्पष्ट आश्वासनाचा अभाव दिसून आला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करणे शक्य नसल्याचे स्पष्टच सांगितले होते. विरोधकांनी नेमका हाच मुद्दा पकडून भाजपला कोंडीत पकडले. महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यासह बहुतांशी उमेदवारांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा लावून धरल्यावर भाजपने देखील नंतर जुनी पेन्शन योजना आम्हीच देऊ शकतो, असे सांगत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. गाणारांबद्धल अंतर्गत नाराजी आणि जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्याचा फटका गाणार यांना बसल्याचे मानले जात आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सुमारे ३४ हजार ३५९ शिक्षक मतदारांनी म्हणजेच ८६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
राजस्थानी मसाला टिक्कड आणि बाजरे की खिचडी EP.NO 79| Rajasthani tikkar recipe |Bajra khichdi recipe|
1,480 total views, 3 views today