
महावितरणने दिली कामांना गती, शेतकऱ्यांना दिलासा
नागपूर. कृषीपंपाला वीजजोडणीसाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतरही दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. यालाच पेड पेंडिंग संबोधले जाते. पेड पेंडिगची प्रकरणे सातत्याने वाढतच आहेत. महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यावर भर दिला आहे. त्यानुसार महावितरणने गेल्या दहा महिन्यात प्रतीक्षा यादीतील एक लाखावर शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी वीज जोडणी दिली आहे. महावितरणने 1 एप्रिल 2022 ते 30 जानेवारी 2023 पर्यंतच्या काळात जोडणीसाठी अर्ज केलेल्या प्रतीक्षायादीतील 1 लाख 4 हजार 709 शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली. त्यापैकी सुमारे 54 हजार जोडण्या गेल्या तीन महिन्यांत दिल्या. पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने केलेल्या गतिमान कारवाईला यश येताना दिसते आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन कनेक्शन देण्याच्या बाबतीत एक लाखाचा टप्पासुद्धा महावितरणने नुकताच ओलांडला.
महावितरणने 1 एप्रिल 2022 नंतर 30 जानेवारी 2023 अखेर चालू आर्थिक वर्षात दहा महिन्यात दिलेल्या पेड पेंडिंग जोडण्यांची संख्या 1,04,709 इतकी झाली. त्यापैकी सुमारे 54,000 इतकी कनेक्शन महावितरणने केवळ गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दिली आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. ऊर्जा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना महावितरणला दिली होती. महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सुमारे पन्नास हजार कृषी पंपांना वीज कनेक्शन दिली होती. त्यापेक्षा जास्त कनेक्शन नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या तीन महिन्यात देण्यात आली.
महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार कामाला गती आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 31 मार्च 2023 पर्यंत आगामी दोन महिन्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
1,333 total views, 6 views today