नागपूर.- (Nagpur) शालेय परीक्षा आटोपल्या असून निकालांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातून सकारात्मक आणि दुर्दैवी प्रकरही घडू लागले आहेत. नापास झाल्यामुळे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यावर वडील रागावले. आतातरी चांगला अभ्यास करण्याचा दम भरला. पण, त्याचा मुलाच्या मनावर विपरित परिणाम झाला. रागाच्या भरात त्याने थेट आपल्या खोलीत जाऊन गळफास लावून घेत आत्महत्या (Failed in exam, father got angry, son committed suicide ) केली. शनिवारी सायंकाळी नागपूरच्या नवीन इंदोरा (New Indora in Nagpur ) परिसरातील बाराखोली परिसरात ही घटना उघडकीस आली. मुलाने जीवन संपविल्याने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. ही घटना अन्य पालकांचीदेखील चिंता वाढविणारी ठरली आहे. अशात पालकांनी किशोरवयीन मुलांसोबत वागताना योग्य काळजी घेऊन कोणताही विषय योग्य पद्धीतीने हाताळण्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जातो आहे.
पुष्कर रतन गजभीये असे मृत मुलाचे नाव आहे. (New indora)नवीन इंदोरा, बाराखोली चौक येथील रहिवासी असलेल्या पुष्करचे वडील रतन गडभिये खासगी काम करतात. त्यांचा मुलगा पुष्कर हा नववीत होता. नुकताच शाळेचा निकाल लागला. त्यात पुष्कर नापास झाला. तो निकाल घेऊन घरी आला. शनिवारी दुपारी 4 वाजता वडिलांनी निकाल बघीतला मुलगा नापस झाल्याने ते चांगलेच रागावले. आता पुढच्या वर्षीतरी अभ्यास करण्याचा सल्ला दिला. यानंतर ते कामानिमित्त घराबाहेर निघून गेले. वडिलांच्या रागावण्यामुळे पुष्कर दुखावला गेला. तो रडतच आपल्या खोलीत निघून गेला. त्याने छताच्या पंख्याला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा नापास झाल्याने सारेच त्याच्य़ावर नाराज होते. यामुळे वडील रागावल्यानंतरही कुणीही त्याची समजूत काढण्यासाठी गेले नाही. नेहमीच्या सवयीप्रमाणे कुटुंबीयांनी सायंकाळी त्याला चहा घेण्यासाठी आवाज दिला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार प्रयत्न करूनही आत कोणतीच हालचाल होत नसल्याने शंका आली. खिडकीतून बघितले असता पुष्कर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. कुटुंबियांनी लगेच पुष्करला खाली उतरवून मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोवर बराच उशिर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111