

सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू : सामाजिक कार्यकर्ते
या कार्यक्रमाची व्यवस्था अतिशय खराब होती. राहण्याचीही व्यवस्था योग्य प्रकारे केली नव्हती. त्यातच कार्यक्रमासाठी (MAHARASHTRA)महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातच्या काही भागातून लोक आले होते. हे लोक आधीच आल्यामुळे ते मैदानातच थांबले. रविवारी दुपारच्या रणरणत्या उन्हात, कोणत्याही संरक्षणाशिवास ते थेट सूर्यप्रकाशात बसले होते, असं (KHARGHAR)खारघरमधील एका रहिवाशाने सांगितलं. तर सरकराच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे मृत्यू झाल्याचा दावा, सामाजित कार्यकर्ते राजीव मिश्रा यांनी केला आहे.
या कार्यक्रमात वैद्यकीय सेवेसाठी तैनात असलेल्या डॉक्टरांपैकी एकाने सांगितली की, “सुमारे 30 लोकांना उपजिल्हा रुग्णालय-पनवेल, NMMC आणि वाशीमधील फोर्टिस, नेरुळमधील डीवाय पाटील हॉस्पिटल, कामोठे आणि बेलापूर इथल्या एमजीएम रुग्णालय तर खारघरमधील टाटा कॅन्सर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. ते डिहायड्रेशन (निर्जलीकरण), छातीत दुखणे, रक्तातील साखरेची पातळी वाढणे यासह इतर आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. काही लोकांना ओआरएस पावडर देण्यात आली होती. तसंच त्यांना सावलीत किंवा वारा असलेल्या ठिकाणी बसण्यास सांगितले होतं.”
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची भरपाई
दरम्यान या कार्यक्रमाद मृत पावलेल्या श्री सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली तसंच आजारी असलेल्यांचा उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असंही जाहीर केलं.
चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112