

विविध ब्राह्मण संघटनांचा पाठिंबा
नागपूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नागपूरच्यावतीने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त रविवार, 23 एप्रिल रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गोरक्षण मंदिर, वर्धा रोड येथून सकाळी 7 वाजता माजी आमदार व भाजपा नेते प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते श्री परशुराम यांचे पूजन करून रॅलीला प्रारंभ होणार आहे.रॅलीमध्ये भगवान श्री परशुरामाचा आकर्षक चित्ररथ राहणार असून शंखनाद केला जाणार आहे. रांगोळ्या घालून, पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणचे नागरिक रॅलीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.13 किमीचा प्रवास करत राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे रॅलीचा समारोप होईल. समारोपीय कार्यक्रमाला माजी महापौर दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, सायंटिफिक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष गडकरी, सचिव अरविंद गडीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सर्वभाषीय ब्राह्मणांना व ब्राह्मण संघटनांना एकत्र करून ब्राह्मण समाजाचा सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक विकास साधण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ(Brahmin Federation) मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या रॅलीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील लोकांना संघटीत करणे, हा उद्देश आहे.रॅलीमध्ये शहरातील विविध ब्राह्मण संघटना सहभागी होणार आहेत. त्यात विश्वकेशरी फाउंडेशन, ब्राह्मण सेवा संघ, परशूराम सेवा संघ, सर्व भाषिय ब्राह्मण संघ, सार्थक महाराष्ट्रीयन ब्राह्मण उद्योजक वेलफेअर मंडळ, बीबीएन नागपूर, पौरोहित्य संघ, कराडे ब्राह्मण संघ, चित्पावन ब्राह्मण संघ, अखिल ब्रह्मवृंद सेवा संस्था, करणी सेना, सनातन संस्था, अखिल विश्व शरयू पारीन ब्राह्मण महासभा इत्यादींचा समावेश आहे. रॅलीत ब्राह्मण संघटना व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आले आहे. ………13 किमी भव्य रॅलीचा मार्ग
गोरक्षण मंदिर येथून प्रारंभ – रहाटे कॉलनी चौक – लोकमत चौक – पिकेव्ही होस्टेल चौक काचिपुरा – के. वानखेडे हॉल – शुभमंगल हॉल भगवाघर धरमपेठ – व्हीआयपी रोड ट्रॅफिक पार्क – झेंडा चौक – गिरीपेठ – मामा रोड – कॉफी हाऊस चौक – रामनगर चौक – लक्ष्मीभुवन चौक – शंकरनगर चौक – अभ्यंकरनगर चौक – माटे चौक – प्रतापनगर चौक – सोमलवार स्कूल – लंडन स्ट्रीट – मालविय नगर – खामला रोड – अर्जुना सेलिब्रेशन खामला – ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक – देवनगर चौक – तात्या टोपे हॉल – आठ रस्ता चौक – अशोका हॉटेल – राणी लक्ष्मीबाई हॉल लक्ष्मीनगर येथे समारोप होणार आहे.नीर दोसा आणि आटेका दोसा | Neer Dosa Recipe | Atta Dosa Recipe | Ep-113 | Shankhnaad News |