
निवडणूक

अकोला जिल्हातल्या 7 पैकी 3 कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान
अकोला : (AKOLA)अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट आणि बार्शिटाकळी या तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या तिन्ही बाजार समित्यांमध्ये विविध मतदारसंघात 128 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भाग्य आज मतपेटीत सीलबंद होत आहे. प्रत्येकी 18 संचालकपदाकरिता ही निवडणूक होत असून यामध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 32 उमेदवार रिंगणात होते.त्यापैकी 5 उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 60 पैकी 2 उमेदवार अविरोध होऊन आता 58 उमेदवार रिंगणात आहेत. बार्शिटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 40 उमेदवार आपले भाग्य अजमावत आहेत.या तिन्ही बाजार समितीकरिता मतमोजणी 29 एप्रिलला सकाळी 9 वाजता होणार आहे. यंदा या निवडणुकीत प्रथमच वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले असल्याने य निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्हे आहेत. दरम्यान, 30 एप्रिल रोजी जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, मूर्तिजापूर व पातूर या चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मतदान होणार आहे.. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये कोणाचा गुलाल उधळला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117