

गडचिरोलीतील मुरखळा येथे अपघात
गडचिरोली. अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन स्मारकावर जाऊन धडकला. गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील (Gadchiroli – Chandrapur route ) मुरखळा (नवेगाव) ग्रामपंचायतजवळील (Murkhala (Navegaon) Gram Panchayat ) या अपघातात रस्त्यावरील पादचारी आणि ट्रकमधील प्रवासी असे दोघे ठार झाले. ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे (Truck hits monument, 2 killed, 1 serious). ट्रकमधील मृत्यू झालेल्या प्रवाशाची ओळख पटू शकली नाही. त्याचा मृतदेह ट्रकमध्येच अडकून पडला होता. मुकरू गोमसकार (55) रा.मुरखळा असे मृत पादचाऱ्याचे तर पिंटू मजोके असे गंभीर जखमी असलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पोलिसांनी पंचनामा करीत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. चालकालाही उपचारासाठी दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करीत तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, सूरजागड येथे लोह खनिजाची वाहतूक करणारा ट्रकचालक पिंटू मजोके किसाननगर येथे घरी जाण्यासाठी निघाला होता. वाटेत व्याहाड येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या एका प्रवाशाला गाडीत बसवले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास गडचिरोली – चंद्रपूर मार्गावरील मुरखळा ग्रामपंचायतजवळ ट्रकसमोर दुचाकीस्वार अचानक समोर आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. ट्रकने ग्रामपंचायत समोरील स्मारकाला धडक दिली. यात मुरखळा येथील रहिवासी मुकरू गोमसकार यांचा व ट्रकमध्ये बसलेल्या अनोळखी प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.भंडाऱ्यातही अपघात, दोघांचा मृत्यू
दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, उपचारासाठी नेत असताना दुसऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना निलज काकेपार रस्त्यावर घडली. भाष्कर भाऊराव मालोदे (47) व कवडू अभिमन मालोदे (37) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही काकेपार येथील रहिवासी आहेत. भास्कर मालोदे हे मेंढेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष होते तर कवडू मालोदे हे संचालक होते. पवनी येथील कामे आटोपून रात्री स्वगावी काकेपार येथे परत जात असताना निलज काकेपार रस्त्यावर असलेल्या मोडीवर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात भास्कर मालोदे यांचा जागीच मृत्यू झाला. कवडू मालोदे यांना उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना ठाणा गावाजवळ मृत्यू झाला.