मुंबईः “अजित पवार हे शांत बसतील, असे वाटत नाही. कदाचित दिवाळीपर्यंत ते पुन्हा आमदारांची जमवाजमव करतील आणि मोठा दगाफटका करतील…”, असा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला (Social Activist Anjali Damania) आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यावर अजित पवार चर्चेचा केंद्रबिंदू ठरले होते. त्यावर भाष्य करताना दमानिया यांनी अजित पवार यांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी झाल्याचे मत व्यक्त केले. राजकारणाचा उकिरडा करुन ठेवला आहे, असेही त्या म्हणाल्या. शरद पवारांची अवस्था माझीच बॅट आणि माझाच बॉल अशी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याबाबत एक स्फोटक विधान केले होते. अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याच्या त्यांच्या विधानामुळे मोठी खळबळ माजली होती. मात्र अजित पवार यांनी नंतर या वावड्या असल्याचा दावा केला होता.