मुंबई- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे बारसूला सभा घेणारच नव्हते ती महाडला आहे ते फक्त तिथे चर्चा करणार होते. सरकारने आंदोलकांचे म्हणणं समजून घ्यावं ही त्यांची भूमिका आहे. त्यानंतर ते महाडला जातील. मात्र,येऊ देणार नाही. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी अटक केली पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी केली.
ठाकरे कुटुंबीय आणि कोकणचे एक नातं आहे. कोकणी जनतेवर जेव्हा जेव्हा हल्ला झाला , तेव्हा तेव्हा शिवसेना येथे धावून गेली शिवसेना भांडवलदारांची दलाल नाही. जे भांडवलदारांचे दलाल आहेत. त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची भीती वाटते म्हणून ते धमक्या देतात. या देशात या राज्यात लोकशाही आहे. आंदोलक त्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना अतिरेकी पद्धतीची वागणूक देत आहे हे चुकीचं आहे. शरद पवार यांचा राजीनामा तो एक भावनिक निर्णय होता आणि लोकांच्या आग्रहाखातर तो त्यांनी मागे घेतला. राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षांकडे शरद पवारांसारखं नेतृत्व पाहिजे असं आम्हाला वाटतं. अजित पवार यांचे नेते सुद्धा शरद पवारच आहेत. दरम्यान,नारायण राणे यांनी खरंतर उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला असायला हवा होतं. जो संवाद उद्धव ठाकरे तिथल्या लोकांशी करणार होते , ते पाहायला त्यांनी हवं होतं असा चिमटा राऊत यांनी काढला. उद्धव ठाकरे पक्षाचे सर्वोच्च नेते आहे. कालच लोकसभेच्या बाबतीत चर्चा केली आपण काँग्रेस सोबत बसून चर्चा करू असं ते म्हणाले आहेत.