मुंबई : ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी यांना मिळणारे मानधन मासिक १४ हजार ग्रा. पंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी यांना मासिक वेतन १७००० हजार त्याप्रमाणे कोतवाल यांना मासिक १५००० देण्याचे मान्य केले. अंगणवाडी सेविकास व मदतनिस, आशा, गटप्रवर्तक यांच्यासुध्दा मानधनात वाढ करण्यात आली. परंतु आरोग्य उपकेंद्रात रात्र दिवस (ANM) बरोबर काम करुन सुध्दा या महिला परिचाराचा विचार केला जात नाही वरील सर्व कर्मचाऱ्यांचा वाढीचा शासनाने विचार करुन मानधनात वाढ करण्यात आली. त्याप्रमाणे महिला परिचारांना किमान वेतन देणे न्यायोचित व तर्कसंगत आहे महाराष्ट्रातील १०६७३ महिला भगिनी तीव्र साखळी उपोषणावर बसले आहेत. जोपर्यंत महिला परिचरांचा शासन विचार करत नाही. तोपर्यंत संप सुरुच राहील असा निर्धार बोलून दाखविला आहे.