गोंदिया : कोकणातील बारसू येथील प्रस्ताविक रिफायनरीच्या प्रकल्पाला निवडक लोकांचा विरोध आहे. खरे तर हा विरोध हा फक्त गुणात्मक प्रदूषण या बाबतीत नसून फक्त विरोधासाठी विरोध केला जात आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (Forest Minister Sudhir Mungantiwar on Barsoo Project). सोमवारी गोंदिया येथे बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बारसूची जागा निश्चित करण्यासाठी त्यांनीच पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते. मी ते दुसऱ्यांच्या सांगण्यावरून पत्र लिहिले, असे उद्धव ठाकरे सांगत असतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
एमआयएम चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी चित्रपट क्षेत्रातही आघाडीवर असते, असा टोला त्यांनी लगावला. त्याचा समाचार घेताना मुनगंटीवार म्हणाले, असे एक कोटी ओवेसी जन्माला आले तरी नरेंद्र मोदी बनू शकत नाही
दरम्यान, मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. यापूर्वीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कितीदा मंत्रालयात बसले, यावर श्वेतपत्रिकाच काढली पाहिजे. त्यांच्या कार्याकाळात मंत्रालयात हजारो दारुच्या बाटल्या सापडल्या. हे मंत्रालयाचे काम आहे का, असा सवाल उपस्थित करताना विद्यमान सरकारचे मंत्री केवळ मंत्रालयात बसत नसून ते फिरतही असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.