

– खा श्रीकांत शिंदेंचा अजित पवारांवर निशाणा
नागपूर (Nagpur): स्वतःची ओळख काकाच्या नावाने असणाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओळखीची चिंता करू नये, जे धनदांडग्यांना जमले नाही ती हिम्मत एकनाथ शिंदे यांनी दाखविली. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यासारखेच ते वागले मात्र पुन्हा पहाटेच्या सत्तेची पुनरावृत्ती झाली. ‘काका मला वाचवा’ अशी त्यांची अवस्था झाली या शब्दात आज शिवसेना नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे(Shiv Sena leader Dr Shrikant Shinde)यांनी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार (Ajit Pawar)यांच्यावर निशाणा साधला . पूर्व विदर्भातील कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने आज मंगळवारी रात्री ते स्थानिक हॉटेल सेंटर पॉइंट येथे मार्गदर्शन करताना बोलत होते. सर्वसामान्यातला माणूस मुख्यमंत्री झाला. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ सर्वसामान्यांसाठी खुले आहे. अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम झाला. हे मी म्हणत नाही तर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. फेसबुक लाईव्हवर नंबर पहिला आला. खोटी आश्वासने देत त्यांनी कारभार केला. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दोन वेळा कोरोना होऊनही लोकांसाठी काम केले.दुसरीकडे कोविडच्या नावावर अडीच वर्षे स्वतःही घरात आणि राज्यात ‘लॉकडाऊन’अशी परिस्थिती या महाराष्ट्रात बघायला मिळाली या शब्दात त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery ) यांच्यावर हल्ला चढवला. गद्दार असतो तर शिंदे साहेबांसोबत लोक जोडले गेले नसते आता हे तुम्ही थांबवू शकणार नाही. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही सत्तेसाठी तिकडे गेलात, कोण कुणाची भांडी घासतो हे महाराष्ट्राने बघितले आहे. अजितदादा सारखा आत्मक्लेष करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. लोकांना अभिप्रेत असेच काम शिंदे- फडणवीस सरकार करीत आहे. सत्तेसाठी एकत्र आलेली ही आघाडी अधिक काळ चालणार नाही असा इशारा दिला. यावेळी खासदार (Krupal Tumane ) कृपाल तुमाने, आमदार (Ashish Jayswal)आशिष जयस्वाल, आमदार (Narendra Bhondekar)नरेंद्र भोंडेकर, (Kiran Pandav)किरण पांडव, (Mangesh Kashikar) मंगेश काशीकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.