(Buldhana)बुलढाणा : ( Chainsukh Sancheti)भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखालील (Malakapur Urban Bank)मलकापूर अर्बन बँकेच्या कथित गैर व्यवहाराच्या कामकाजाची एका महिन्यात कलम 88 अन्वये चौकशी करण्याची मागणी राज्य (Kaka Koyte, President, Cooperative Credit Union Federation)सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी येथे केली. प्राप्त चौकशी अहवाल अंती दोषी संचालकांविरुद्ध जवाबदारी निश्चित करून वसुलीसाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची खळबळजनक मागणीही त्यांनी केली..
बुलढाणा (Buldhana Urban Residency)अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना कोयटे यांनी मलकापूर अर्बनच्या गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे.ठेवीदार व पतसंस्थाना न्याय देण्याची मागणी करीत चौकशी संदर्भात विविध मागण्या केल्या. यावेळी (Adv.Mangesh Vyavhare)ऍड मंगेश व्यवहारे, मलकापूर अर्बन बँक पतसंस्था ठेवीदार कृतीसमितीचे समन्वयक (Sudarshan Bhalerao)सुदर्शन भालेराव, (Vice President Dr. Shantilal Shingi)उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी हजर होते.