नाशिक (Nashik)– मी जो निर्णय घेतला आहे, तो कायद्याला धरून घेतलेला आहे.त्यानंतरच 16 आमदारांना अपात्र केले आहे. आजचा निकाल योग्यच लागेल हे सगळे आमदार अपात्र होतील, असा विश्वास आहे असे मत (Legislative Assembly Vice President Narahari Jirwal)विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले. दरम्यान,अजित पवार नाशिक मध्ये आले याची कल्पना नाही.त्यांचा खाजगी दौरा असेल तर त्यावर भाष्य करणे योग्य नाही असे स्पष्ट केले. आत्ताच्या अध्यक्षांकडे जरी निर्णय आला तरी ते योग्य निर्णय घेतील. घटनेला आधारित नियम घेतील जर तसा निर्णय आला नाहीतर घटनेविषयी संशय येईल. अपात्रतेचा निर्णय हा अपात्रतेचाच होईल. सुप्रीम कोर्ट कायदा तपासूनच निर्णय घेईल असा मला विश्वास.