नवी दिल्ली (New Dillhi): “तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray resignation) यांनी स्वखुशीने राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणता आले असते”, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरुवारी राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकालातून केली आहे. सत्तासंघर्षाचा निकालाचे वाचन करताना (Chief Justice Dhananjay Chandrachud)सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, “तत्कालीन मुख्यमंत्री (Uddhav Thackery) उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांचे सरकार परत आणले असते.” त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामाच त्यांच्यासाठी आत्मघात ठरल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना शिंदे गटाचे (Advocate Harish Salve) वकील हरीश साळवे यांनी नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यामुळ त्यांनी राजीनामा दिल्यावर नव्या सरकारसाठी तत्कालीन राज्यपालांना पुढील कार्यवाही पार पाडणे भाग होते, असा युक्तिवाद हरिश साळवे (Harish Salve )यांनी केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने नेमका हाच युक्तिवाद ग्राह्य धरताना निर्णय फिरवता येणार नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले.
पवारांचाही आक्षेप होता
उद्धव ठाकरे यांनी कोणालाही विश्वासात न घेता परस्पर राजीनाम्याचा निर्णय घेतला, असा आक्षेप महाविकास आघाडीचे प्रणेते (Sharad Pawar)शरद पवार यांनीही घेतला होता.