नागपूर : भाजपविरोधात रान पेटविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आता आवाज बंद करण्याचा प्रयत्न, ईडी समन्सच्या निमित्ताने केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाहीत असा इशारा दिला.
परमवीर सिंग यांच्यावर 10 च्या वर गंभीर गुन्हे आहेत. परमवीर सिंग हे फरार होते.भाजप-सेना सरकार आल्यावर त्यानी कॅटकडे अर्ज केला. कॅटच्या अपीलवर राज्य सरकारने उत्तर न दिल्याने कॅटने त्यांना क्लीनचिट दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असल्याचेच यातून सिद्ध झाले. दरम्यान, जयंत पाटील यांना दुसऱ्यांना ईडीने समन्स दिला, हा आमचा, विरोधकांचा सातत्याने आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र ईडी असेल किंवा कुठलीही तपास यंत्रणा असेल तरी आमचा आवाज दाबू शकत नाही.पहिल्या समन्स च्या वेळी त्यांना महत्वाचे लग्न असल्याने गेले नाही, आता ते निश्चितच ईडीला सामोरे जाणार आहेत.त्यांचा कुठल्याही प्रकारणांशी संबंध नाही हे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे.
परमवीर सिंग यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत, तरी त्यांना क्लीनचिट देणे म्हणजे भाजप त्यांना संरक्षण देत आहेत. सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करत आहे. भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची चौकशी नाही हाच या कार्यपद्धतीचा पुरावा आहे असेही कुंटे म्हणाले.