नागपूर : उच्च कमाल तापमान आर्द्रता व गरम हवेमुळे संपूर्ण विदर्भात सध्या उष्णतेची लाट जाणवत आहे. अजून पुढील दोन-तीन दिवस कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे. काल रविवारी व आज देखील तापमानाची नोंद 40 ते 45 अंश सेलसिअस दरम्यान नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे थंड पेयाकडे लोक आकर्षित होत आहे. उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळावा व आराम मिळावा यासाठी थंड पेयांच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ज्यूस, उसाचा रस, थंड पेय पिण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी शितपेयाच्या दुकानांवर दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे ज्यूस विक्रेते यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असून शीतपेय विक्रेत्यांचा रोजगार वाढला आहे. काही दिवस ढगाळ वातावरण असले तरी सध्या गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात तापमान जाणवत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.