मुंबईः उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात एकही नोकरी दिली नाही. तरुणांसाठी एकाही उपक्रम राबविला नाही. जो रिकामटेकडा माणूस अडीच वर्षात दोन तासच मंत्रालयात गेला, त्याच्या तुलनेत पंतप्रधान मोदी हे रोज सोळा ते अठरा तास काम करतात. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. लोकशाहीत जय आणि पराजय होतच असतो, असेही राणे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सांगितले.
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सत्ता गेल्यामुळे डिप्रेशनमध्ये आहेत. संजय राऊतांना सध्या काहीही कामधंदा नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो. त्यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलू नयेत. संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्यामुळे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे वेड्यासारखे बडबडत आहेत. हे लोक चांगले बोलू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.