अमरावती – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार देण्याचे आश्वासन पाळले नाही , त्यामुळे दिवसेंदिवस राज्यासह संपूर्ण देशात रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. युवक बेरोजगार झाले, त्यामुळे दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना प्रति महिना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, केंद्र व राज्य सरकारने नोकर भरती राबवावी यासाठी भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली यावेळी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या विरोधात फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.