बुलडाणा – खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाष पेसोडे तर उपसभापतीपदी संघपाल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये याही वेळेस माजी आमदार दिलीप कुमार सानंदा प्रणित महाविकास आघाडीने 18 पैकी पंधरा जागांवर दणदणीत विजय प्राप्त करून बाजार समितीवर आपला झेंडा रोवला . आज सभापती आणि उपसभापतीची निवडणूक बिनविरोधपणे झाली. विदर्भातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत बाजार समित्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वर यावेळेसही महाविकास आघाडी व मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडी आपला झेंडा कायम ठेवण्यात यशस्वी झाली. ही निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे आमदार आकाश फुंडकर यांच्यात होती.