मुंबई – आज झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत सर्व जिल्हा प्रमुखांना सर्वोच्च न्यायालायाचा निर्णय आपल्या भागातील कार्यकर्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोचवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दिली.
येत्या 18 जूनला मुंबईमध्ये राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे. 19 जूनला मुंबईत वर्धापन दिन सोहळा साजरा केला जाणार असून सुप्रिम कोर्टाचा निकाल गावागावांत पोहचवणार असल्याचे दानवे म्हणाले.