कल्याण – डोंबिवलीत एका मुलीसोबत साखरपुडा करुन दुसरीसोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची अखेर पोलिसांनीच थेट पोलीस ठाण्यात वरात काढल्याची घटना घडली. या प्रकरणी डोंबिवली मधील विष्णुनगर पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या आई-वडिलांवरही बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ‘सिद्धार्थ शिंदे’ असे या आरोपी नवरदेवाचे नाव आहे. 4 वर्षा पूर्वी पीडित मुलीला एका लग्ना दरम्यान भेटत तिच्या आईवडिलांना लग्न करत असल्याचे भासवत पीडित मुलीशी साखरपुडा केला. तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेऊन तिच्याशी लग्न न करता दुसऱ्याच मुलीशी लग्न केले. पोलिसांनी कलम ३७६ , ४२० या गुन्ह्या अंर्तगत गुन्हा दाखल केला गेला आहे. डोंबिवलीत राहणार ‘सिद्धार्थ शिंदे’ या तरुणाला 4 वर्षापूर्वी नातेवाईकांच्या लग्नात पीडित तरुणी दिसली व त्याचे तिच्यावर प्रेम जडले. तिच्याशी लग्न करण्यासाठी सिद्धार्थने आई-वडिलांना सांगून , पीडित मुलीशी चार वर्षापूर्वी साखरपुडा केला होता. त्यानंतर चार वर्षे तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवून होता. मात्र तिच्याशी लग्न न करत एका दुसऱ्याच मुलीशी त्याने लग्न केले. याची माहिती पीडित तरुणीला मिळताच पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठत ‘सिद्धार्थ व त्याच्या आई-वडिलांच्या’ विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच डोंबिवली विष्णुनगर पोलिसांनी दुसरी सोबत सातजन्माची गाठ बांधणाऱ्या नवरदेवाची थेट पोलीस ठाण्यात वरात काढली आता सिद्धार्थला साथ देणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे.