नागपूर: वरिष्ठ रेल्वे अधिकारी श्री राजीव त्यागी यांनी १० मे रोजी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (प्रकल्प) म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी श्री अतुल गाडगीळ, संचालक (कार्य) पुणे मेट्रो यांच्यानंतर पदभार स्वीकारला, ज्यांना श्री महेश कुमार अग्रवाल यांनी मागील वर्षी ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती.
१९८९ बॅचचे आयआरएसईअधिकारी, श्री राजीव त्यागी यांनी कटनी (पूर्व) मध्य प्रदेश येथे सहाय्यक अभियंता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि ट्रॅक मॉडर्नायझेशनच्या क्षेत्रात कार्य केले. मध्य रेल्वेच्या मुंबई सबर्बन येथे अनेक पदावर कार्य केले आहेत. सबर्बन सिस्टममध्ये विविध ट्रॅक मशींन्स आणण्यात आणि देखभाल करण्याच्या चांगल्या पद्धतींमध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
श्री राजीव त्यागी यांनी मुंबई येथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) चे मुख्य महाव्यवस्थापक म्हणूनही कार्य केले आहे त्यांनी डब्ल्यूडीएफसीचे सर्वात आव्हानात्मक अश्या(JN) जेएन पोर्ट-वैतरणा सेक्कशन हाताळले आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी असून जे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे आर्थिक संसाधनांचे नियोजन, विकास आणि एकत्रीकरण तसेच निर्माण व देखभाल संचालन करते.
श्री. त्यागी सध्याच्या नेणूकीपूर्वी दक्षिण मध्य रेल्वे (SCR) मध्ये मुख्य अभियंता (ट्रॅक प्रोक्युरमेंट) या महत्वाच्या पदावर कार्यभार सांभाळत होते आणि संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेकरिता पाथवे मटेरियलचे नियोजन आणि खरेदीसाठी ते जबाबदार होते. त्यांना १९९८ आणि २००६ मध्ये दोनदा महाव्यवस्थापक पुरस्कार मिळाला आहे .
एक कुशल अधिकारी असे श्री. त्यागी यांनी सिंगापूर येथे ऍडव्हान्स मॅनेजमेन्ट , इटली येथे ट्रॅक मॉनिटरिंग, जर्मनी आणि डेन्मार्क येथे शहरी ट्रेन इन्फ्रा सिस्टीम आणि यूएसए (USA)मध्ये हेवी हॉल (Heavy Haul) सिस्टमचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना २००८ मध्ये प्रतिष्ठित रेल्वेमंत्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. श्री राजीव त्यागी क्रीडाप्रेमी असून त्यांना क्रिकेट खेळाची आवड आहे.