नागपूर : काल पावसाच्या हजेरीनंतर रात्रीपासून नागपुरात कमालीचा उकाडा वाढला. आज गुरुवारी वर्धा येथे सर्वाधिक 43 अंश से.तापमानाची नोंद झाली. या खालोखाल अकोला, अमरावतीला 42.6,चंद्रपूरला 42.4 तर नागपूरला 42.2 असे तापमान होते. यवतमाळला 42.4, गोंदिया 41.2,भंडारा 41.7,वाशिम 41.6,बुलडाणा 39.7 अशी तापमानाची नोंद झाली. 48 तास हवामानात बदल नसून यानंतर 2 ते 3 अंशाने तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उष्माघाताच्या घटना वाढल्याने शहरातील अनेक चौकातील सिग्नल्स दुपारच्या वेळी वाहतूक पोलिसांनी बंद केले आहेत.