– महेश चौधरी, बदलापूर
आज कर्नाटकात भाजपची होत असलेली हार ही अपेक्षितच आहे. त्याची झलक दिल्ली नगरपालिका व हिमाचलच्या निवडणुकीतच दिसली होती परंतु भाजपचे तथाकथित चाणक्य हे आपल्याच धुंदीत आपले तर्क वापरून आभासी चित्र निर्माण करत होते .
2014 चा भाजपचा विजय हा अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन व सिस्टीमला कंटाळलेली जनता होती. तिला मोदींजीकडून अपेक्षा निर्माण झाल्याने भाजपला मते भरभरून दिली व 5 वर्षात ही घाण साफ होणार नाही म्हणून आणखी 5 वर्ष भाजपला भरभरून मते देऊन सत्ता दिली. गफलत इथेच झाली. भाजपच्या चाणक्यांना वाटले की हे सगळे हिंदुत्वाला व संघ विचारसरणीला मिळालेले यश आहे आणि मग भजपचे वैचारिक अधःपतन होऊ लागले व संघ परिवारातील सगळेच तिचे खुजे समर्थन करू लागले. त्यांना विसर पडला की भाजपला मिळालेले मतदान हे फक्त संघ परिवाराने केलेले नसून समाजातील एका मोठ्या घटकाने केलेले आहे की ज्याला व्यवस्थेत काहीतरी बदल हवाय, वाढलेला भ्रष्टाचार नकोय ,सुटसुटीत व्यवस्था हवीय. राममंदीर ,370 ह्यामुळे परिवारातील मतदार, हिंदुत्ववादी यांची मोट घट्ट बांधली गेली पण बाकी जनतेच काय की ज्यांनी भाजप ला मतदान केलंय .
राजकारणात नैतिकता हवी असे म्हणणारे भाजपने बेसुमार अनैतिकता सुरू केली ,बळाच्या जोरावर आधी कर्नाटक , मध्य प्रदेश ,नंतर महाराट्रातील विरोधी पक्षांचे सरकारे पाडली आणि हे मात्र सर्वसामान्य जनतेला आवडले नाही . भाजपचे चाणक्य मात्र आपल्याच खुशीत गाजर खात होते . व भाजपची खेळी कशी भारी आहे ह्यावर लेख लिहित होते .2014 असो की 2019 साली भाजप ला मिळालेले मतदान हे सगळेच हिंदुत्वावर मिळालेले न्हवते हे मात्र तथाकथित चाणक्य विसरले होते .आपल्या नेत्यांना खुश करण्याच्या नादात ते वस्तुस्थिती विसरून नेत्यांच्या उदो उदो करण्यात व्यस्त होते. महाराष्ट्रात होत असलेला तमाशा नक्कीच भाजप ला 2024 ला सत्ते पासून दूर ढकलत आहे .आज GST कलेक्शन प्रचंड होतोय ,lic सारख्या संस्था चे खाजगिकरण होतंय , अगदी lic च्या हप्त्या पासून ते मरणाच्या सामाना पर्यंत प्रत्येक गोष्टीवर GST लावून जनतेला वेठीला धरले जातेय ,भ्रष्टाचार तसु भसर ही कमी होत नाहिये, भ्रष्टाचारी नेत्यांना ED ,CBI ची धमकी देऊन एक तर भाजप त आणले जाते किंवा त्यांना चौकशी च्या फेऱ्यात अडकवले जाते याला सगळी जनता विटली आहे . काश्मीर चे 370 काढणे असो की प्रभू रामाचे मंदिर असो हे जरी अस्मितेचे आस्थेचे विषय असले तरी शेवटी जनतेला सुसह्य वाटणारे निर्णय अपेक्षित होते . राहुल गांधींनी टिंगल करून तात्पुरते मनोरंजन होते पण तुमचे अपयश झाकले जात नाही .
सातपुडा असो की सह्याद्री सारख्या अति दुर्गम भागात शासकीय यंत्रणा पाहचू शकली नाही हे वास्तव आहे. मात्र तेथे मिशनरी त्यांचे कामे करून समर्थन मिळवत आहेत .मन की बात आता टिंगलीचा विषय झालाय हे कोणी तरी मोदीजी ना सांगायला हवे पण इतके धाडस कोणात ही नाही . भाजप चे भाट वस्तुस्थिती समजून ही उमजली नसल्याचे सोंग घेऊन मतदारांनी हिंदुत्वाला कसे नाकारले याचा राग आवळतील पण त्याने परिस्थितीत सुधारणा न होता आणखी बिघडत जाईल ,काही भाजप चाणक्य 2024 साली राम मंदिर पूर्ण होऊन त्याच्या लाटेत भाजप तरेल असे मनसुबे पाहत आहे पण प्रत्येकवेळी प्रभू राम भाजप ला तारून नेईल हे साक्षात रामाला ही मान्य नसेल .
आजच्या परिस्थिती जरी निवडणूक झाली तरी भाजप व मित्र पक्षाना 225 च्या पुढे जागा मिळणे कठीण आहे व राजकारणात भाजप हा काम सरो वैद्य मरो असे वागत असल्याने त्याला नवीन मित्र मिळणे कठीण होत चालले आहे .पण तथाकथित चाणक्यांना याचे देणेघेणे नसून ते 2024 जिंकल्याच्या गप्पा मारत आहे .हे म्हणजे भाजपचे काँग्रेसी करणं झाल्याचे मोठे उदाहरण आहे वैचारिक व तात्विक दृष्ट्या मूळ तत्वांना फाट्यावर मारल्यावर अधोगतीच होणार हे मात्र नक्की ,अजून ही जवळपास एक वर्ष हातात आहे ,कर सुधरले व नवीन मित्राची जोडणी केली तर च 2024 ला भाजपला यश मिळेल ,नाहीतर एखादा चमत्कारच भाजपला वाचवू शकतो कारण आता ते सामान्य माणसाच्या हाता बाहेर गेलंय हे नक्की . तथाकथीत चाणक्यांनी आपल्या कोषातून बाहेर पडून सद्य स्थितीचा आढावा घ्यावा नाहीतर ह्या पतनाचे तेच मुख्य धनी असतील. असो… भाजपला पुढील निवडणुकीला शुभेच्छा.