नागपूर – भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय म्हणजेच नोटबंदी नसून नोटवापसी असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सुधाकर अत्रे यांनी व्यक्त केले. या नव्या निर्णयाबाबत ते ‘शंखनाद’शी बोलत होते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या . त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता . यावेळी २ हजारांच्या नोटेच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत सरकारने चलनात कायम ठेवली आहे . तोवर त्या बँकांत जमा करता येतील .मात्र, ३० सप्टेंबरनंतर काय ? याबाबत आरबीआयने अद्याप काहीही म्हटलेले नाही . रिझर्व्ह बँकेनुसार २ हजारांच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्याचे आदेश बँकांना दिले आहेत.काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी २ हजारांच्या नोटेचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता .त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई २०१८-१९ मध्येच बंद केली होती , मग २ हजारांच्याच्या नोटांचं करणार तरी काय ?असा प्रश्न निर्माण झाल्यावर आता या नोटाच चलनातून बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे या नोटा जमा आहेत ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बँकेत जमा करू शकणार आहेत यावर अत्रे यांनी भर दिला.
२० हजार रुपयांचीच मर्यादा का ? दरम्यान,बँकांचे नियमित कामकाज विस्कळीत होऊ नये , तसेच परिचालन सुविधा कायम राहावी यासाठी २ हजारांच्या नोटा बँकांतून बदलून घेण्यासाठी एकाच वेळी २० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे . यासंदर्भात बँकांनाही तसे नियोजन करावे लागणार आहे . मात्र, चलनातील नोटा कमी होतील काय ? २ हजार रुपयांच्या नोटांचा व्यवहारातील वापर कमी झाला आहे . तसेच इतर नोटांचा साठा जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे . त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण कमी होणार नाही . मात्र , २००० ची नोट वैध चलन ‘ म्हणून कायम राहणार आहे . २ हजार रुपयांची नोट चलन, वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला . या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे .मात्र तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असल्यास त्याचे उत्तर इन्कम टॅक्स विभागाला द्यावं लागणार आहे असेही अत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.