शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णलयात विचापूस करण्यासाठी दाखल झालेत. कालपासून मनोहर जोशी यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे हिंदुजा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाणार आहे.