नागपूर – आज नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाने महाल बडकस चौकात राहुल गांधींच्या पुतळ्याचे दहन करून आपला निषेध व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने राहुल गांधींचा एक व्हिडिओ जारी केला होता, त्या व्हिडिओवर भारतीय जनता युवा मोर्चाने तीव्र आक्षेप घेतला होता. यामध्ये राहुल गांधींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी करण्यात आल्याचे म्हटले असून हे भारतीय जनता युवा मोर्चा कदापि सहन करणार नाही, राहुल गांधींनी या व्हिडिओबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे, आणि देशाची माफी मागावी अशी मागणी, घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवानी दाणी यासंदर्भात म्हणाल्या की, भारत जोडो प्रवास करून राहुल गांधी स्वतःला खूप मोठे समजू लागले आहेत. देशाची माफी मागा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राहुल गांधी राहत असलेल्या घरी जाऊन त्यांना उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.