नागपूर : नरखेड बाजार समितीची निवडणूक मागील आठवड्यात संपन्न झाली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींवर अविश्वास प्रस्ताव ठेवला होता. त्यासंदर्भात आज सर्व सदस्यांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये 11 सदस्यांनी विरोधात मतदान केले असते तर हा अविश्वास ठराव ग्राह्य धरला गेला असता. परंतु विरोधकांना हे जमलं नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचाच सभापती राहील, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.