अमरावती- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मोर्चा निघाला.
शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असूनआंदोलनापूर्वीच स्वाभिमानीचे कार्यकर्ते कपिल पडघाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.जिल्हा कृषी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.