नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याचे जिव्हाळ्याचे नगदी पीक म्हणजेच कांदा व द्राक्ष आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने, चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील शेतकरी अर्जुन चव्हाण या शेतकऱ्यांनी एक एकर टोमॅटोची लागवड केली. त्याला एकुण लागवड खर्च 40 ते 50 हजार रुपये आला. मात्र बाजारात सध्या दोन ते चार रुपये किलोने टोमॅटोला भाव मिळत आहे. अशाने शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाचा उत्पन्न खर्च देखील निघत नाही. परिणामी या शेतकऱ्याने आपल्या शेतातील टोमॅटो विक्री करण्याऐवजी टोमॅटोची झाडे तोडून रस्तावर फेकून दिली.