

प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान होत असताना जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षकांना अजूनही अनेक जिल्ह्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे प्रदान झालेले नाही. यासाठी शासनाकडे वारंवार निवेदने सादर करूनही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या थकबाकीच्या हप्त्यांचे प्रदान होण्याबाबत शासन आणि प्रशासनाच्या स्तरावर असलेले औदासिन्य संतापजनक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.