मणिपूर प्रकरणावर राजकारण करणं योग्य नाही – प्रफुल्ल पटेल

0
44

 

भंडारा – मनिपुर येथील घटना अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. खरेतर हा विषय देशातील सर्व पक्षांनी एकत्र येवून सोडवला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सरकार मनिपुर विषयावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, विरोधक या विषयाचे राजकारण करीत आहेत, ते त्यांनी करु नये असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. पटेल म्हणाले,मणिपूर सरकार व केंन्द्र सरकार मणिपूर येथील विषयावर बारीक लक्ष ठेवून आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः तीन दिवस मणिपूर येथे ठाण मांडून होते.
राज्यपाल नियुक्त बारा आमदार संदर्भात बोलताना त्यांनी आता राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मोकळा झाला आहे. तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागा वाटप निश्चित करून त्यानुसार यादी मुख्यमंत्री यांच्याकडे सोपवतील असा विश्वास व्यक्त केला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा