वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

0
61

अमरावती- महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडेंविरुद्ध अखेर अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमरावतीतीत राजापेठ पोलिसांनी कलम १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे यांच्याविरुद्ध काँग्रेसने अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती येथे भिडे यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. सरकारने त्यांचा आजच बंदोबस्त करून त्यांना अटक करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती.
अमरावतीच्या बडनेरा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या वडिलांबाबत केलेले विधान वादात सापडले आहे. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केले होते. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा देखील भिडेंनी केला होता.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा