त्या मार्गावर पुन्हा अपघात सहा ठार, 30 जखमी

0
492

बुलढाणा, Buldhana, २९ जुलै : मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहा वरती दोन ट्रॅव्हल्सच्या बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे ३० जण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.Two travel buses collided head-on on highway number six in Malkapur city. In this terrible accident, six passengers died on the spot and around 30 people were injured. Meanwhile, the death toll is expected to increase. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज, शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर घडली. एमएच 08. 9458 ही बस अमरनाथची तीर्थयात्रा करून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. तर एमएच 27 बीएक्स 4466 या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवासी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरहून नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरश: चुराडा झाला. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, दसरखेड एमआयडीसीचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

अपघातानंतर जखमी झालेल्यांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, ग्रामीण पो.नी. एफ.सी. मिर्झा यांनी भेट दिली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा