बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत करावी-बंडखोर नेत्याचं आवाहन

0
54

हरिद्वार: बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानच्या बंडखोर नेत्या व निर्वासित पंतप्रधान नेला कादरी यांनी केली आहे. कादरी या सध्या भारतात आल्या असून हरिद्वार येथील घाटावर त्यांनी गंगेची आरती केली. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यास यश मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. कादरी यांनी त्यांच्या समर्थकांसह बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू केला असून त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केले आहे.
पाकिस्तानने बलुचिस्तानचा प्रदेश जबरदस्तीने बळकावला आहे. त्याच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रात आवाज उठवला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठिंबा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्याची भारताला आज संधी आहे. ती उद्या कदाचित मिळण्याची शक्यता नाही. भारताने पूर्ण ताकदीनिशी बलुचिस्तानच्या मागे उभे रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा