संभाजी भिडेंचा भाजपशी संबंध नाही, सरकारच कारवाई करेल-बावनकुळे

0
42

नागपूर- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजपने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून संभाजी भिडे आणि आमचा कुठलाही संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. संभाजी भिडे हे स्वतंत्र असून ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्यास सरकार ते तपासून त्यावर कारवाई करेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
संभाजी भिडे हे भाजपचे पिल्लू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा