पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार देण्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार

0
50

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातच राहाणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक रोहित टिळक यांनी दिली आहे. तर दुसरीकडे दिल्ली अध्यादेश विधेयक संसदेत मांडले जाणार असताना त्या दिवशी शरद पवार हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.
दिल्ली अध्यादेशाचे विधेयक ज्या दिवशी सभागृहात मांडले जाणार आहे, त्याच दिवशी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून पवार हे त्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता दिल्ली अध्यादेशावर अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देण्याबाबत शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार, यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. हे विधेयक ज्या दिवशी येणार आहे, त्या त्या दिवशी शरद पवार यांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशी विनंती आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिल्लीतील राज्य सराकारविरोधात काढलेल्या अध्यादेशावर मतदान घेतले जाणार आहे. या अध्यादेशाच्या आडून विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न केजरीवाल यांनी केले आहेत. मात्र, त्यांना यात कितपत यश आले, हे मतदानातून स्पष्ट होणार आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा