कोरोनात आई वडील दगावलेल्या बालकांना बालन्याय निधीतून मदत द्या – आ. प्रवीण दटके

0
45

कोरोना काळात आई वडील दगावले असे हजारो विद्यार्थी शासनाकडे मदतीची अपेक्षेने पाहत आहेत .सरकारने बाल न्याय निधी आणि क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून मदत देऊ केली आहे , परंतु त्याची प्रभावी अंमबजावणी होण्यासाठी आ .प्रवीण दटके यांनी विधान परिषद सभागृहात प्रश्न उपस्थित केला. नागपूर महापालिकेतील 36 असे बालके आहेत ज्यांचे आई वडील दोघेही दगावले आणि 631 असे बालके आहेत ज्यांचे आई किंवा वडील दगावले आहेत एकूण 667 बालकांना अद्याप 1 रुपयाही मिळाला नाही, तो कधी देणार ? असा प्रश्न आमदार दटके यांनी उपस्थित केला . वरील प्रश्नाला  महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सकारात्मक उत्तर देत तातडीने निधी वितरीत करू असे सभागृहाला आश्वस्त केले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा