
पालघर Palghar : पालघर जिल्ह्यात जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानाने केलेल्या गोळीबारात (Jaipur Express Firing) आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर गाडीची चेन ओढून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जवानाला पोलिसांनी पकडले. या घटनेतील आरोपी चेतन सिंह सध्या लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात ताब्यात असून त्याची बोरीवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेतील चारही मृतकांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले असून फॉरेन्सिकचे पथकही येथे दाखल जाले आहे.The bodies of all the four deceased in the incident have been taken to Shatabdi Hospital in Kandivali for postmortem and a forensic team has also been admitted here.
पहाटे साडेपाच वाजतच्या सुमारास ही घटना जवान चेतनसिंह याने गाडीच्या बी-५, एस-६ आणि पँट्री कार या डब्यांमध्ये गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. यात टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ) तसेच प्रवासी अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरावाला (रा. नालासोपारा, वय 50 वर्षे), अख्तर अब्बास अली,( रा. शिवडी. वय 48 वर्षे) व अन्य प्रवाशाचा समावेश आहे. वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. आरोपीने फायरिंग केल्यानंतर गाडीचे चेन खेचून गाडी थांबवली. तो पळून जात असतानाच शेजारीच ड्युटीवरील पोलिसांनी त्याला पकडले.

यासंदर्भात या गाडीतील एसी कोचचे अटेंडंट कृष्णकुमार शुक्ला यांनी सांगितले की, सकाळी ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास डब्यात गोळीबाराचा आवाज आला. एक जवानाच्या हातात बंदूक घेऊन होता व एएसआयला गोळी मारल्यावर ते खाली पडले होते. जवान हातात बंदूक घेऊन डब्यात फिरत होता. जवानाने अन्य प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे डब्यातील सर्व प्रवाशी घाबरले होते.
कारण काय?
यामागीलन नेमके कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी काही प्रवाशांच्या मते गाडी वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला की त्याने प्रवाशांवर बंदूक उगारली. आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांनी त्याला चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो काहीच काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता व त्याच्या वरिष्ठासह प्रवाशांवरही गोळीबार केला. यात चारही जण घटनास्थळीच दगावले.
मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई
दरम्यान, पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांनी सांगितले की, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.