
संभाजी भिडेंना अटक करा,वंचित बहुजन आघाडीची मागणी
अकोला – मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे राज्यात फिरून महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी व महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान व देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे व्यक्तव्य करीत आहेत. अमरावती येथिल बेताल विधानाबाबत त्या विकृत माणसावर गुन्हा दाखल केला असला तरी ते मोकाट फिरत आहेत. त्यांना 24 तासात अटक करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करण्यात आली.
महापुरुषांबद्दल बोलतांना आपली मर्यादा बघा – आ बच्चू कडू
अमरावती- महापुरुषांबद्दल बोलतांना आपली मर्यादा बघा असा सबुरीचा अ
सल्ला आ बच्चू कडू यांनी दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, संभाजी भिडे यांनी महापुरुषांबद्दल बोलतांना आपली औकात पाहिली पाहिजे.भिडे स्वातंत्र्या पूर्वी जन्माला आले होते का ? या लढ्यात तुमचं योगदान काय? राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना बदनाम करणं चुकीच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपाने यावर तातडीने स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही आ कडू यांनी म्हटले आहे.

काँग्रेस कमिटीच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन
वर्धा – काँग्रेस कमिटीच्या वतीने संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत, संभाजी भिडे तसेच भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतात असे म्हणत राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच महापुरुषांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करून संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना तात्काळ अटक करावी. भाजप सरकार संभाजी भिडे यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. मणिपूर येथील प्रकरणावरून लक्ष परावर्तित करण्यासाठी संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. संभाजी भिडे यांच्या मनुवादी विचारसरणीचा आम्ही निषेध करतो असे वर्धा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
संभाजी भिडे भाजपचे सदस्य नाहीत – चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर-संभाजी भिडे प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिंडे आमचे कार्यकर्ते नाहीत, वास्तविक सरकारने दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही, नियमात असेल त्यानुसार कारवाई करू असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
बावनकुळे म्हणाले,संभाजी भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही. किंवा आमचे कार्यकर्तेही नाहीत. त्यामुळे भाजपशी जो संबंध जोडला जातो तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे. भाजपचा त्यांचा काहीही संबंध नाही. विरोधकांचं काम राजकारण करणचं आहे. पण सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे, यात सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे.
दरम्यान,यशोमती ठाकूर यांच्या बाबतीत छेडले असता त्यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने काँग्रेस भाजपवर आरोप करत आहे.त्यांना धमकी येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपशी जोडणे हे त्यांच्या मतदारसंघाच्या राजकारणाचा भाग आहे अशी टीका केली.
प्रधानमंत्री आणि शरद पवार पुणे येथे कार्यक्रमात उद्या एका मंचावर येत आहे, बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आहे. तो नॉन पॉलिटीकल कार्यक्रम आहे, जे असे वातावरण निर्माण करत आहे ते योग्य नाही असे बावनकुळे म्हणाले.महायुतीत जेव्हा आमचे उमेदवार उभे होतील तेव्हा महायुतीचे सगळे नेते प्रचाराला येतील. भुजबळ उभे राहतील तेव्हा आम्ही सगळे नेते त्यांच्या प्रचाराला जाणार आहोत. त्यांनी बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. विपर्यास कोणीच करू नये. महायुतीत एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार करतील. आमच्या मंचावर ते येतील त्यांच्या मंचावर आम्ही जाऊ. ही महायुती आहे, असा माझा बोलण्याचा अर्थ होता.
अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या काळात बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्याच्या तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. तक्रारी सरकारकडे पाठवल्या असून सरकार त्यावर चौकशी करेल असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.