
नागपूर – अंबाझरी तलावात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात इकोपीया वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने शहराचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात आली आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या नागपूरकरांनी देखील याबाबतीत चिंता व्यक्त केली. स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात सेल्फीसाठी होणाऱ्या गर्दीतही पर्यावरणाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे ‘ शंखनाद’ च्या निदर्शनास आले. आज अंबाझरीमध्ये पोहणाऱ्या व परिसरात रोज भ्रमंती करण्यास येणाऱ्या काही सामाजिक संवेदना असलेल्या लोकांनी हे धोकादायक वनस्पती काढण्याचे काम सुरू केले आहे मुळात ही वनस्पती खूप झपाट्याने वाढत आहे व याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यास लवकरच ही वनस्पति पूर्ण तलाव व्यापून टाकेल असा धोका आहे. विशेष म्हणजे ही वनस्पती गेल्या दोन वर्षापासून अंबाझरी तलावामध्ये आपले जाळे पसरवत असताना याकडे कुणीही लक्ष दिलेले नाही.महानगर पालिकेच्या वतीने हे काम तातडीने करणे जरूरी आहे अन्यथा लवकरच अंबाझरी तलाव दिसेनासा झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती पर्यावरण प्रेमिनी व्यक्त केली आहे, महापालिका व जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत शहरच्या दृशतेने मत्वाच्या आशा ऐका प्रेक्षणीय तलावाचे संरक्षण करावे अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे,