आमदार शिरसाटांच्या ‘त्या’ वक्तव्यावर वाद सुरुच

0
48

मुंबई-खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद संपण्याची चिन्हे दिसत नाही. आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांचे सौंदर्य पाहून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचे वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले होते, असा दावा आमदार शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. खासदार चतुर्वेदी यांनी त्यावर शिरसाट हे गद्दार आणि असभ्य चारित्र्याचे असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनीही शिरसाट हे सडक्या विचारांचे असल्याची टीका केली आहे.
आमदार शिरसाट यांनी एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा उल्लेख उल्लेख केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार चतुर्वेदी म्हणाल्या की, मी कशी दिसते आणि कशी खासदार बनले, हे संजय शिरसाट यांनी सांगायची गरज नाही. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यातून असभ्य चारित्र्य दाखवून दिले आहे आणि ते भाजपसोबत आहेत ही आश्चर्याची बाब नसल्याचे त्या म्हणाल्या.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा