संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन

0
55

 

अमरावती-अमरावतीत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ जोरदार शक्तिप्रदर्शन झाले. अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात समर्थकांची जोरदार घोषणाबाजी पहायला मिळाली.
शहरात बाईक रॅली काढत सर्व समर्थक सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचले.काँग्रेस आणि यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भिडे समर्थकांनी घोषणाबाजी केली.

 

बुलढाण्यात भिडेंविरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

बुलढाणा – संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बुलढाण्यात काँग्रेस आक्रमक झाली असून संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी बसला दगड मारून काच फोडली असून आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भिडेंना खामगावात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी दिला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा