संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी आक्रमक

0
39

 

बीड – बीडमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शन केले व संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारून दहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. संभाजी भिडे यांच्यासह मणिपूर घटनेचा देखील यावेळी निषेध करण्यात आला. तर संभाजी भिडे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्या व्यक्तीला एक लाखांचे बक्षीस काँग्रेसने जाहीर केले असल्याची माहिती राजेसाहेब देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा