इंग्लिश खाडी टू वे पोहून आशियाई साहसी जलतरणात विक्रम,जयंत दुबळे यांचे जंगी स्वागत 

0
50

 

 

नागपूर – इंग्लंडची जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी- इंग्लंड ते फ्रान्स व फ्रान्स ते इंग्लंड असे टू वे 70 किलोमीटरचे अंतर 31 तास 29 मिनिटांमध्ये जयंत व त्याच्या टीमने पोहून नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणामध्ये अंकित केले आहे.

रेल्वे स्थानकावर जयंत जयप्रकाश दुबळे यांचे जल्लोषात आगमन, स्वागत झाले. याप्रसंगी द्रोणाचार्य अवार्डी विजय मुनीश्वर प्राचार्य डॉ. विजय दातारकर, डॉ. संभाजी भोसले , प्रा. शाम फाळके,मंगेशजी डुके, निखिलेश सावरकर, डॉ. सुरेश चांडक, ॲड. अर्चना मेंडुले, क्रीडा अधिकारी माया दुबळे, ॲड. भूमीता सावरकर, संजीव गरजे, विलास शिंदे, राहुल सलामे, सुभाष लांडे, रामेश्वर लिखार, सुशील दूरगकर, ऐश्वर्या दुबळे, प्राजक्ता दुबळे, आशिष आढाव व शेकडो जलतरणपटू, खेळाडू , क्रीडा संघटक यांनी रेल्वे स्टेशनवर ढोल ताशाच्या गजरात जयंत व भारतीय संघाचे स्विमिंग कोच डॉ. जयप्रकाश दुबळे यांचे भव्य स्वागत केले. गेल्या तीन वर्षापासून तयारी सुरू होती.आज ही इंग्लिश खाडी पोहून मला अतिशय आनंद होत आहे, नागपूरमधूनही असे सागरी जलतरणपटू तयार व्हावेत, त्याकरिता मी प्रयत्नशील राहणार आहे , असे जयंतने याप्रसंगी सांगितले.यावेळी

नागपूर जिल्हा हौशी जलतरण संघटना ,मोहता स्पोर्ट्स अकॅडमी, भोसले व्यायाम शाळा, डॉल्फिन स्विमिंग क्लब जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग व सर्व उपस्थितांचे डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आभार मानले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा